Rudraksh rahasya in marathi

रुद्राक्षाच्या मुख्यपरत्वे त्याचे प्रकार आणि त्याची देवता व गुणधर्म


१ मुखी:-  अत्यंत दुर्मिळ समजला जातो. महान योगीच हा धारण करतात. यामुळे षडरिपुनवर विजय मिळवता येतो. सर्व मनोकामनापूर्ती होते. याची देवता परमात्मा शिव आहे. धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो.


२ मुखी :- हा अर्धनारी नटेश्वर चे प्रतीक आहे. हा धारण केला तर व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होतो. धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात वश करू शकतो. पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य , दु:ख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगती साठी हा धारण करतात


३ मुखी :- अग्निदेवतेचे प्रतिक. हा धारण करणार्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय मिळवता येतो. बुद्धी कुशाग्र होते.


४ मुखी :- ब्रम्हदेवचे प्रतीक. याचा प्रभाव धारण कर्त्याच्या जिभेवर होतो. अल्पावधीतच तो वक्ता साहेस्रेशू या पदविला पोहोचतो. स्मरणशक्ती तीव्र होते.


५ मुखी :- पंचानन शिवाचे प्रतीक. पंच महाभूतंचा यात समावेश होतो. धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. सर्वार्थाने उत्कृष्ट असतो. तरीही सहज उपलब्ध होतो म्हणून याकडे कोणीही लक्ष देत नाही. अन्य रुद्राक्षाकडेच आकर्षित होतात.


६ मुखी :- कार्तिकेय स्वरूप. या वर माता पार्वती व माता लक्ष्मी ची सुद्धा कृपादृष्टी आहे. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही.


७ मुखी:- सप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक . माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दीर्घायुष्य व अपघातपासून रक्षण करतो. याच्या धiरणाने मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्प दांवशiपासून रक्षण होते.


८ मुखी:-  गणेशाचे प्रतीक. याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणतात. याला अष्टमातृका, त्रिदेवांचा आशीर्वाद लाभला आहे. तांत्रिक लोक याला कुण्डलिणीजागृतीचे साधन मानतात. हा जवळ असेल तर समयसूचकता अंगी बाळगते. अनेक कलामध्ये नैपुण्य येते.


९ मुखी :- भैरवाचे प्रतीक. दुर्गेचा पूर्ण आशीर्वाद. हा रुद्राक्ष धारण करणार्याच्या आसपास दु:ख दैन्य दारिद्र्य कधीच फिरकत नाही.


१० मुखी :- यमराज चे प्रतीक. अष्टदीक्पाल चा आशीर्वाद. हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात.


११ मुखी :- ११ रुद्रांचे प्रतीक, इंद्राचे प्रतिकहि मानतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो.


१२ मुखी :- महाविष्णू तसेच १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक. हा धारण केला असता व्यक्तिमत्व तेजपुंज होते. शत्रूघात व अपघातपासुन रक्षण होते.


१३ मुखी :- कामदेव स्वरूप. याला इंद्रiचा आशीर्वाद लाभला आहे. हा श्रiध्याच्या वेळी धारण केला तर पितरांना सद्गती प्राप्त होते.


१४ मुखी :- हनुमानाचे प्रतीक. हा शेंडीत धारण करतात. योग विद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करतात. गौरी शंकर रुद्राक्ष. हे दोन रुद्राक्ष नैसर्गिक रित्या एकमेकांना चिकटलेले असतात, धारण कर्त्याला शिव-शिवाच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते. हा धारण न करता देवघरात ठेवतात. त्रिभुजी रुद्राक्ष हा अतिशय दुर्मिळ समजला जातो. ३ रुद्राक्ष एकमेकांना चिकटलेले असतात. याला ब्रम्हा-विष्णू-महेशाचे प्रतीक समजले जाते. हा रुद्राक्ष धारण करर्त्याला काहीही कमी पडू देत नाही…


धारण विधान

शुक्ल पक्ष, रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. द्वितीयेला, पंचमी, सप्तमी, दशमी, त्रयोदशी, पौर्णिमा या तिथींना हस्त, रोहिणी, स्वाती,  उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, श्रवण, धनिष्ठा इत्यादी नक्षत्रावर. मेष, कर्क, तूळ, मकर, कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते.


मेष -त्रिमुखी,

वृषभ-षण्मुखी,

मिथुन -चारमुखी,

कर्क-दोनमुखी,

सिंह-एकमुखी, बारामुखी,

कन्या -चारमुखी,

तुला-षण्मुखी,

वृश्चिक-त्रिमुखी,

धनु-पाचमुखी,

मकर-सातमुखी,

कुंभ -सातमुखी,

मीन- पाचमुखी

सर्व साधारण हे प्रचलित आहेत. सर्वानीच रूद्राक्ष धारण करावे.

I BUILT MY SITE FOR FREE USING